तेर /प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील एस.टी.बसस्थानकाच्या प्रसाधनगृहात रिकाम्या दारूच्या बाटल्या खच दिसून आला. तेर येथील एस. टी.बसस्थानकामध्ये महीला व पूरूष यांच्यासाठी प्रसाधनगृह बांधण्यात आलेले आहे.परंतू दारू पिणारे बेवडे प्रसाधनगृहातच दारू पिऊन दारूच्या बाटल्या प्रसाधनगृहात टाकून जात आहेत.

12 फेब्रुवारीला प्रचंड अस्वच्छ झालेले प्रसाधनगृह स्वच्छ करण्यासाठी तेर येथील ग्रामसेवा संघ यांच्या वतीने प्रसाधनगृह स्वच्छ करण्यात आले.प्रसाधनगृह स्वच्छ करताना प्रसाधनगृहात दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला.एस.टी महामंडळ यांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.प्रसाधनगृह स्वच्छ करण्यासाठी अॅड. बालाजी भक्ते, तानाजी पिंपळे, दत्ता कांबळे, बाळासाहेब मुळे, राजकुमार थोडसरे, अंकुश पवार, अशोक पवार, गोविंद खोटे, अमोल कासार, सज्जाद पटेल , सागर गायकवाड, गणेश शिंदे यांनी परीश्रम घेतले.


 
Top