धाराशिव / प्रतिनिधी -

आमदार बचू कडू यांना धाराशिव कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. कलम 506 नुसार कोर्ट उठे पर्यंत म्हणजे कोर्टाचे आजचे कामकाज संपेपर्यंत कोर्टात थांबणायची शिक्षा व 2 हजार 500 रुपये दंड तसेच पुढील काळात चांगले वर्तन केले जाईल असा बॉण्ड शपथपत्र / बंधपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. धाराशिव जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी हे आदेश दिले आहेत.या प्रकरणात ऍड महेंद्र देशमुख यांनी शासकीय अभियोक्ता म्हणून सरकारची बाजू मांडली.

2 नोव्हेंबर 2015 मध्ये धाराशिव जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यात आले या आंदोलन दरम्यान कडू व अधिकारी यांचा वाद झाला होता त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता.अपंग निधी अखर्चित राहिल्याने प्रहारच्या कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते. यावेळी कडू स्वतः हजर होते व त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. त्यात प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बचू कडू, प्रहारचे मयूर काकडे, बलराज रणदिवे, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत जाधव हे 5 आरोपी होते त्यातील इतर सर्व आरोप निर्दोष मुक्त केले आहेत. शासकीय कामात अडथळा यातून सर्व आरोपी निर्दोष मात्र कलम 506 अंतर्गत फक्त बचू कडू दोषी ठरविले आहेत.

सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. मुख्य फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सतीश घंटे, डीवायएसपी हिरे व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांची साक्षी महत्वाची ठरली असे सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी सांगितले.

 
Top