उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धार्मिक स्थळा पैकी एक धार्मिक स्थळ म्हणजे हजरत ख्वाॅजा शमशोद्दीन गाजी यांचा दर्गाह.दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर उरुस म्हणजेच जत्रा भरली जाते,सर्व जाती धर्माचे लोक येथे भक्तीभावाने दर्शनासाठी येतात.हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून दर्गाह ओळखला जातो.पर्यटन जनजागृती संस्था उस्मानाबाद संचलित पर्यटन विकास समितीच्या वतीने जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाऊन स्वच्छता अभियान, अभ्यास,योगा शिबिरे,पुरातन वास्तुचा परिचय मेळावा,सहल अशा विविध माध्यमातून पर्यटकांसाठी खुले अभियान राबविण्यात आले आहेत.

हजरत ख्वाॅजा शमशोद्दीन गाजी यांच्या ७१८ व्या ऊरुसानिमित्त आज दि.४/२/२३ रोजी दर्गाह परिसरात नगर परिषद उस्मानाबाद व पर्यटन विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी दर्गाह बाबत माहिती दिली तर सचीव देविदास पाठक यांनी नगर परिषदेचे कर्मचारी यांचे आभार मानले.या स्वच्छता अभियानात समितीचे अध्यक्ष युवराज नळे,सचिव देविदास पाठक, गणेश वाघमारे,बाबा गुळीग,विजय गायकवाड,नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक विलास गोरे सहित इतर अन्य कर्मचारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.


 
Top