उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरातील खॉजा शम्शोधीन रहे संदल मिरवणूकीत   विजय चौक उस्मानाबाद येथे   जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे जमावबंदीचे, गाणी म्हणणे वाद्य वाजविण्यास मनाई असताना देखील इसम नामे अक्षय बापू लावंड वय 27 रा.चंदननगर पुणे यांने त्याच्या ताब्यातील मालकीचे चारचाकी वाहन टाटा 909 एलपीडी या मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या मोठे मोठे स्पिकर संदल मिरवणुकीत वाद्य व गाणे वाजवले म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पो.स्टे. उस्मानाबाद शहर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे. उस्मानाबाद शहर येथे 05/2023 म.पो.का. कायदा कलम 38/136  अन्वये गुन्हा दाखल करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने 5000/- ₹ आर्थिक दंड ठोठावला आहे. मा.न्यायालयाच्या या कार्यवाहीपुढे डीजे मालकाचे धाबे दणाणले आहेत.


 
Top