तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर नळदुर्ग रस्त्यावर  नगरपरिषद  पाणीटाकी समोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने अडुतीस वर्षिय इसमास  चिरडल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवार दि. ११रोजी सकाळी सवादहा  वाजता घडली.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, शहरातील जिजामाता नगर मधील  नितीन दत्ता लोंढे  (वय ३८ ) हे  नळदुर्ग  रस्त्यावरून पायी चालत जात असताना नगरपरिषद पाणीटाकी रोडसमोर अजिंक्य रेसीडेंन्सी जवळ  अज्ञात वाहनाने त्याना चिरडल्याने तो जागीच ठार झाला हा अपघात एवढा भीषण होता की नितीन चा मेंदुचा  आक्षरशा चेंदामेंदा झाला होता त्यामुळे त्याची ओळख लवकर पटली नाही नंतर,पोलिसांनी प्रयत्न करुन  त्याची ओळख पटवली. 


 
Top