कळंब / प्रतिनिधी-

 कळंब येथे आज दिनांक १२/२/२०२३ रोजी एम डि लाइव्ह फोटो स्टुडिओ देवि रोड येथे व्हाइस ऑफ मिडियाचे शिक्षण व आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चेतनजी कात्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकिचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत दिनांक १९/२/२०२३ रोजी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने कळंब शहरात येणाऱ्या शिवभक्तांना एकेविस हजार रुपयेचे नाष्ट्याची व्यवस्था करण्यात येणार आहे असे सर्वानुमते ठरले असुन तसेच चेतन कात्रे यांनी स्वखर्चाने स्वत: पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार आहेत असे बैठकीत सांगण्यात आले यावेळी बर्याच विषयी चर्चा करण्यात आली तसेच बैठकीत व्हाइस ऑफ मिडिया कळंब तालुका कार्यअध्यक्षपदी रंजीत गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच बैठक संपन्न झाल्यानंतर काही सदस्य यांना आय कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व आरोग्य विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतनजी कात्रे, उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अमरजी चोंदे,श्रीकांतजी मडके,राहुलजी हौसलमल, कळंब तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे, संदिप कोकाटे, दिपक माळी, परमेश्वर पालकर, धनंजय घोगरे, सलमान मुल्ला, रामराजे जगताप,ॲड. मनोजकुमार थोरात, शिवप्रसाद बियाणी व कळंब तालुका व्हाइस ऑफ मिडियाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

 
Top