उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नुक्त्याच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय एबैकस स्पर्धेमधेय यशस्वी झालेल्या गुणवंताचा सत्कार समारंभ समाधान प्रो-एक्टिव एबैकस क्लासेस येथे आयोजित करण्यात आला होता. सदर क्लासेसचे एकूण 7 विद्यार्थी वेगवेगळ्या वयोगटामधेय विजेते ठरले तर 27 विधायर्थीना उतेजनार्थ मेडल देण्यात आले. तसेच शशांक पाटील, राजनंदिनी काटे, रोहान शेख, श्रुष्टि जगदाले, विश्वजया सुरवसे आणि वेदश्री शेळके यांना ट्रॉफी देण्यात आल्या.

सदर कार्यक्रमासाठी अभिनव इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या मा. प्रतिभा मोदानी , डॉ. मेघश्याम पाटिल, डॉ. जितेंद्र शिंदे, बबन वाघमारे आणि क्लासेसच्या संचालिका श्रीमती वैशाली वैभव वाघमारे ह्या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना मोदानी यांनी विद्यार्थ्यांना मोबाइल पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि जास्तीत जास्त सहशालेय उपक्रमामधेय सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता वाढवन्याचा सल्ला दिला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा ताटे, योगिता कुलकर्णी, रगुनाथ वाघमारे यांचे सहकार्य लाभले.


 
Top