कळंब / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध काढण्यात आली सविस्तर वृत्त असे की कन्हेरवाडी सोसायटी सूरवातीला निवडणूकित चांगलीच रंगत होईल असे वाटत होते तेरा जागेसाठी एकोणीस अर्ज दाखल करण्यात आले होते परंतु बिनविरोध काढण्यासाठी गावातील प्रतीष्ठित जेष्ठ नागरिक यांनी पुढाकार घेऊन सहा अर्ज काढण्यात आले आणि अखेर हि निवडणूक बिनविरोध काढण्यात आली यामध्ये १) बिभिषण जनार्दन कवडे २)सौ.मंगल नरसिंग कवडे ३) दत्तात्रय नामदेव कवडे ४) श्रीमती.सोजरबाई सुब्राव कवडे ५)सौ.आशाबाई महादेव कवडे ६) चंद्रकांत प्रल्हादराव जाधव ७)दगडु अंबादास कवडे ८)विश्वनाथ तुळशीराम गायकवाड ९) विठ्ठल साहेबराव धोंगडे १०)शुभाष रावसाहेब कवडे ११)संजय गोवर्धन कवडे १२)अभिमान्यु गोरख हाके १३)सुभाष गुलाब सावंत हे तेरा संचालक बिनविरोध निवड करण्यात आली पण सर्वच राजकीय पक्ष प्रमुखांनी असा दावा केला आहे शिवसेना (ठाकरे गट) सहा तर राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि भाजप तिन असे आपआपल्या  पक्ष प्रमुखामधुन बोलले जात आहे 

 चेअरमन पदाचा फैसला सोळा फेब्रुवारी रोजी होणार चेअरमन पदासाठी रस्सीखेस होत असुन प्रत्येकजण मीच चेअरमन होणार म्हणून बाशिंग बांधून बसलेले आहेत तर यामध्ये शिवसेना ठाकरे गट यांच्या कडुन चंद्रकांत प्रल्हादराव जाधव व दगडु अंबादास कवडे तर राष्ट्रवादी कडुन शुभाष रावसाहेब कवडे व दत्तात्रय नामदेव कवडे आणि भाजप कडुन बिभिषण जनार्दन कवडे हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे तर याचा फैसला सोळा फेब्रुवारीला होणार असून सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 
Top