उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पक्ष हा देशप्रेमी आणि देशहीत पाहणारा पक्ष आहे. पक्षाच्यावतीने देण्यात आलेली वचने पाळण्यात येतात. आपला पक्ष केवळ घोषणा करत नाही तर प्रत्यक्ष काम करणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन धाराशिव प्रदेश समन्वयक वैशाली गुंडपाटील यांनी केले. धाराशिव जिल्हा आढावा बैठक भाजप भवन धाराशिव येथे नुकतीच संपन्न झाली.

  प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार व नेते राणा जगजितसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर आणि सौ. अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये भाजपा महिला मोर्चा धाराशिवच्या प्रदेश समन्वयक वैशाली गुंड पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक नुकतीच झाली. यावेळी मंचावर कळंब तालुका अध्यक्षा दैवशाला पाटील, अस्मिता कांबळे, आशा लांडगे, मनीषा केंद्रे, मीना कदम उपस्थित होते. यावेळी बोलताना गुंडपाटील पुढे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी महिलांच्या प्रगतीसाठी व सक्षमीकरणासाठी ज्या योजना आणल्या आहेत. त्या घराघरात पोहोचविण्याकरिता तसेच धन्यवाद मोदीजी कार्ड नवीन मतदार नोंदणी फेसबुक ट्विटर, व्हॉटस् अॅप खाते उघडणे व जनहिताची केलेली कामे घराघरात पोहोचविण्यासाठी काम केले पाहिजे. समाजातील शेवटच्या स्तरावर विविध योजना पोहोचवण्याचे काम पक्ष आधीपासूनच करत आहे. पूर्वी आपण विरोधी पक्षात बसत होतो, परंतू आता काळ बदलला आहे. सरपंचापासून, राज्यात आणि केंद्रातही आपली सत्ता आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा असे त्या म्हणाल्या.  यावेळी भारतीय जनता महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.नंदा पुनगुडे व कल्पणा निपाणीकर यांनी महिला सबलीकरणासाठी काम करण्याचे विचार अपल्या मनोगतातून मांडले.

 यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, अलकाताई मगर, अलका गौरकर, गवळण ताई, जोशीला लोमटे, मीना कदम, राणी राठोड, विद्या माने यांनी आपल्या कामाची सविस्तर मनोगतातून मांडली. प्रस्ताविक जिल्हा अध्यक्षा नंदा पुनगडे यांनी केले. तर आभार मनीषा केंद्रे यांनी मानले. यावेळी मोठ्यासंख्येनी महिला पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top