उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 धारूर ता.जि उस्मानाबाद येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या 105 व्या शाखेचे उत्साहात उदघाटन करण्यात आले. या शाखेचे उद्घाटन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाखेच्या अध्यक्षपदी शशिकांत गायकवाड,उपाध्यक्षपदी सोमनाथ,सचिवपदी शकील सय्यद, उपसचिवपदी बाळासाहेब कदम,कोषाध्यक्षपदी रामहरी गायकवाड,सहकोषाध्यक्षपदी प्रकाश पवार ,तर सदस्यपदी राजेंद्र रोकडे,मनोज सोनवणे,धनु शिंदे,राहुल गायकवाड,लक्ष्मन कोनाळे, मिलिंद रोकडे,समाधान खांडेकर यांची निवड करण्यात आली 

सदरील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,शहराध्यक्ष जमीर शेख,तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोईटे,महादेव खंडाळकर,नवनाथ मोहिते,बाळासाहेब पाटील,महेश माळी, बाळासाहेब कसबे,महादेव चोपदार,तानाजी लाकाळ, दत्ता पवार,पिंटो डोंगरे, शंकर चव्हाण,आदी मान्यवर उपस्थीत होते. 

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांनी सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आणि येत्या काळात सर्व दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्याची खात्री दिली यावेळी सर्व धारूर गावातील प्रतिष्टीत व वयोवृद्ध नागरिकांची दर्शनीय उपस्थिती होती


 
Top