तेर /प्रतिनिधी

धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयमध्ये गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनीचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापक जे.के. बेदरे तर पाहुणे म्हणून रेल्वे विभागातील चीफ प्रोजेक्ट मॅनेजर प्रदिप पौळ, डॉ. सुनंदा कटके , डॉ. पियुष कटके,माजी मुख्याध्यापक  एस.बी. नाईकवाडी , व्ही. बी. अबदारे , शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एजाज बागवान,अॅड. बालाजी भक्ते, राजाभाऊ माने यांची उपस्थित होते. यावेळी  दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनीचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी  प्रदीप पौळ, डॉ.सुनंदा कटके,डॉ.पीयूष कटके,व्ही.बी.अबदारे, एजाज बागवान यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.टी. चव्हाण यांनी केले तर आभार एस.एस. बळवंतराव  यांनी मानले.


 
Top