तेर /प्रतिनिधी

धाराशिवद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथील विविध स्पर्धेतील विजेत्या गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थीनीचा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तेर येथील जि.प.प्राथमिक शाळा पेठ येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह क्रीडा कार्यालय त्याचबरोबर सार्वजनिक मंडळासह प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय स्तरावर घेण्यात  आलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंताचा गौरव  व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील , सरपंच दिदी  काळे , उपसरपंच श्रीमंत फंड , माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी ,   शालेय.व्यवस्थापन.समितीचे अध्यक्ष विलास पाडूळे ,तेर सोसायटीचे चेअरमन सतीश कदम , पद्माकर फंड, अजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती . जि.प.पेठ.शाळेतील विद्यार्थ्यांनी  बीटस्तरीय ,  तालुकास्तरीय , जिल्हा स्तरांवरील विविध प्रकारच्या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनीचा  ,राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंचा  गौरव अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे या शाळेची निवड  प्रधानमंत्री शैक्षणिक धोरण क्र .3 साठी निवड  झाली असून  त्यामधून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळणार आहे. शाळेसाठी भौगोलिक शैक्षणिक या सुविधा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरपूर वाव मिळणार तर आहे त्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी पालक , शिक्षक यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतीपादन  केले. पालकाची खरी इस्टेट ही आपण शिकविलेला आपला मुलगा ,मुलगी असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी सांगितले .  कार्यक्रमास विठ्ठल लामतुरे, जुनेद मोमीन, राम कोळी ,धनंजय आंधळे , अभिमन्यू रसाळ , मुख्याध्याक  गणपती यरकळ ,  गोरोबा पाडूळे ,  क्रिडा मार्गदर्शक हरी खोटे  , सचीन देवकते  , भगिरथ पडूळकर  , सचीन देवकते , आदिंसह सह पालक महिला  उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मुख्यध्यापक  गणपती यरकळ , गोरोबा पाडूळे  , क्रिडा शिक्षक हरी खोटे , गोरख चौरे  , शशिकांत देशमुख , चंद्रकांत गिरे , लता बंडगर , रोहिणी हलसीकर , वर्षा शेजाळ  , उषा नाईक  ,  प्रभावती मुंडे  ,  शकुंतला पांचाळ , आदिनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरोबा पाडूळे यांनी केले .

 
Top