धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव शहरातील शाहू महाराज चौक ते किंग्ज हॉटेल दरम्यान झालेले अतिक्रमण न काढल्यामुळे दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी धाराशिव शहरात रास्ता रोको करण्यात आले. धाराशिव शहरातील छत्रपती नगर,रमाई नगर, मिलींद नगर, शालीमार हॉटेल, म्हाडा कॉलोनी आणि एमआयडीसी मध्ये जाण्यासाठी सर्व्हिस रोड आयआरबी कंपनीने केला आहे. परंतु या भागात हजारो नागरिक राहत आहेत.परंतु त्यांची येण्या जाण्याची सोय केलेली नाही. या भागातील विद्यार्थ्यांना सायकल वरून जाण्या-येण्यासाठी अडचण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवमुठीत घेउन जावे लागत आहे. 

आयआरबीच्या काही कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संगणमताने सदरचे अतिक्रमण ठेवण्यात आलेले आहे. यापुर्वीही आम्ही वेळोवेळी सदर अतिक्रमण लक्षात आणून दिले आहे. परंतु अद्याप पर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आज रोजी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी उस्मानाबाद येथे एमआयडीसी परिसरात शिंगोली रेस्टहाउस जवळ ठिक १२ वाजता रास्ता रोको करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार राजाराम केलूरकर,आयआरबीचे प्रोजेक्ट अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी मध्यस्थी करून लवकरात लवकर पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढू असे आश्वासन दिल्याने रास्ता रोको थांबविण्यात आले. 

यावेळी प्रामुख्याने अनुराधा लोखंडे महिला जिल्हाध्यक्ष, बी.डी. शिंदे, बाबा वाघमारे,शितल चव्हाण, मंगल आवाड, लक्ष्मी गायकवाड, सुमन वाघमारे, लोचनाबाई भालेराव, सुरेखा गंगावणे, संगीता वाघमारे, सिंधू लोंढे, मनिषा रनशिंगारे, शेखर बनसोडे आणि भाउसाहेब अणदूरकर उपस्थित होते. वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.


 
Top