धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद ,यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जिल्हा मेळावा उस्मानाबाद भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा कार्यालय येथे घेण्यात आला. सदर मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद चे प्राचार्य डॉक्टर दयानंद जतनुरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधा साळुंखे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तथा जिल्हा मुख्य आयुक्त गजानन सुसर, डॉ . पद्मसिंह पाटील पतसंस्थेचे चेअरमन विक्रम भैया पाटील ,मेळावा प्रमुख (गाईड )उषा सर्जे, मेळावा प्रमुख (स्काऊट) दिलीप चौधरी, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त दीपक  पोतदार,सविता पांढरे, जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे ,मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने ,माजी कोषाध्यक्ष उदय पाटील, ज्येष्ठ  गाईडर शकुंतला जगताप ,सरस्वती घुले ,अजय कुंभार, भास्कर खामकर ,शुभांगी पाटील, सुवर्णा शिंगे , कलाध्यापक शेषनाथ वाघ यांच्या हस्ते लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले .यावेळी सर्वांनी स्काऊट गाईड चळवळ व त्याचे कार्य याविषयी समाधान व्यक्त केले व ही मूल्य रुजवणारी चळवळ प्रत्येक शाळेत सुरू झाली पाहिजे असे मत व्यक्त केले .

सदर जिल्हा मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील एकूण ४० शाळांतील ६५० कब- बुलबुल ,स्काऊट, गाईड व शिक्षक यांनी सहभाग घेतला यामध्ये विद्यार्थी तीन दिवस उपस्थित होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था तंबू मध्ये करण्यात आली होती .या तीन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना चारित्र्य, हस्तव्यवसाय ,आरोग्य व सेवा या चार मूलभूत घटकावर आधारित शिकवण देण्यात आली. मेळाव्यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये बिन भांड्याचा स्वयंपाक, संचलन ,समूहगीत, लोकनृत्य ,शोभायात्रा, तंबू सजावट स्पर्धा, प्रश्नमंजुषा, भव्य शेकोटी कार्यक्रम इत्यादी घेण्यात आल्या.सदर स्पर्धेला फुलाई मल्टीस्टेटचे चेअरमन प्रदीप खामकर ,भाई उध्दवराव पाटील पतसंस्थेचे सचिव अमर देशमुख ,सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार इत्यादी उपस्थित होते. जिल्हा मेळावा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमास नितीनजी काळे जिल्हाध्यक्ष भाजप, नेताजी पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उस्मानाबाद, अस्मिता कांबळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सुरेश टेकाळे अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघ, माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप ,क्रीडा अधिकारी कैलास लटके ,तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे ,जेष्ठ स्काऊटर कुरणे गुरुजी ,सास्तुरकर ,देविदास पाठक पत्रकार, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी चे वितरण करण्यात आले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश धोंगडे व सुखदेव भालेकर यांनी केले तर प्रास्ताविक मेळावा प्रमुख उषा सर्जे व आभार जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे यांनी मांडले.हा मेळावा उत्साहाने संपन्न झाला. मेळाव्याचा समारोप राष्ट्रगीताने झाला.


 
Top