परंडा / प्रतिनिधी-

पंचायत समिती परंडा येथे तुती लागवड पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी महारेशिम अभियान अंतर्गत परंडा तालुक्यातील शेतकरी, लाभार्थी यांना तुती लागवड च्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम व परंडा तालुका हा शेतीपूरक व्यवसायात अग्रेसर आहे तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पीक पद्धत मध्ये अमुलाग्र बदल करून तुती लागवड (रेशीम उद्योग) कडे वाटचाल करून  मग्रारोहयो अंतर्गत  अप्पर मुख्य सचिव श्री.नंदकुमार साहेब यांच्या संकल्पनेतून गावातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासें यांच्या मार्गदर्शनाखाली तुती लागवडीच्या माध्यमातून लखपती संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी तसेच अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन मी समृद्ध तर गाव समृद्ध अन गाव समृद्ध तर मी समृद्ध अंतर्गत प्रत्येक कुटुंब लखपती होण्यास उपलब्ध झालेल्या संधीचा फायदा घेण्याचे आहवान उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी केले आहे या कामी बँक स्तरावरून देखील गरजू शेतकरी यांना आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्याचे आश्वस्त केले.

 या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद रोजगार हमी योजनेचे  महेंद्रकुमार कांबळे, उस्मानाबाद अधिकारी कोकाटे , रेशीम अधिकारी आरती वाकुरे, क्षेत्रीय अधिकारी एम गवंड, प्रभारी गटविकास अधिकारी श्री ए राठोड, प्रभारी तहसीलदार सुजित वाबळे, वनक्षेत्रपाल अधिकारी तळेकर, विस्तार अधिकारी जगदेव वग्गे, विस्तार अधिकारी जोगदंड जी, विस्तार कृषी अधिकारी सुरज बोडके , उमेद तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम ढोरे, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, रेशीम उद्योग शेतकरी राजेंद्र जगताप, रेशीम उद्योग शेतकरी गणेश चव्हाण, विठ्ठल चव्हाण, शेतकरी रमेश बारस्कर, रोजगार सेवक तालुका अध्यक्ष नागनाथ भोसले, APO, PTO कर्मचारी सुधीर देडगे, तुषार गायकवाड, विकास बनसोडे, चव्हाण साहेब, तांत्रिक अधिकारी मोरे जी, पाटील जी, करळे जी, CFP टीम किशोर मांदळे, मायादेवी बनसोडे, दिपाली कोळी परंडा तालुक्यातील मंडळ अधिकारी, कृषी विभाग चे अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top