परंडा / प्रतिनिधी-

भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या मागणीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी परंडा शहरासाठी ३ कोटी विशेष निधी सिमेंट रस्ता ड्रेनलाईन, स्मशानभूमी सुधारणा करणेसाठी निधी दिलेला असुन खालील कामांचे भूमिपूजन दि२१ रोजी मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या ५६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कामे १) परंडा नगरपरिषद हद्दीतील पोलिस ठाणे मागील रस्ता ते भवानीशंकर मंदिरापर्यंत सी.सी. रोड करणे.२) परंडा नगरपरिषद हद्दीतील बावची रोड महाराणा प्रताप चौक ते भवानीशंकर मंदिरापर्यंत सी. सी. रोड करणे.३) परंडा नगरपरिषद हद्दीतील बावची रोड स्मशानभूमी येथे पंप दहनशेड, वेटींग शेड, बांधकाम करणे व पेविंग ब्लाॅक बसविणे.४) परंडा नगरपरिषद हद्दीतील विद्या नगर येथे सी.सी. नाली व गटार करणे.५) परंडा नगरपरिषद हद्दीतील खासापुरी चौक ते जय भवानी गणेश नगर पर्यंत सी. सी. नाली करणे.अशा एकुण २ कोटी ८० लक्ष कामाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

     यावेळी परंडा नगरपरिषद च्या मुख्याधिकारी सौ. मनिषा वडेपल्ली, अभियंता सौ. ऐश्वर्या म्हमाणे, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, विकास कुलकर्णी, सुबोधसिंह ठाकूर, ॲड.जहीर चौधरी, संदीप शेळके, समीर पठाण तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

 
Top