तुळजापूर / प्रतिनिधी-          

 गोवा राज्याचे  मुख्यमंत्री डॉ.  प्रमोद सावंत यांचा तुळजापूर येथे त्यांच्या काँलेज काळातील   मित्रांच्या वतीने तिर्थक्षेञ तुळजापूरात   स्वागत व सत्कार करण्यात आला.    गोव्याचे मुख्यमंत्री  प्रमोद  सावंत हे तिर्थक्षेञ तुळजापूरला श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी येणार असल्याचे समजताच तुळजापूर शहरामध्ये ठीक ठिकाणी त्यांच्या स्वागतार्थ  डिजिटल लावण्यात आले .

  नंतर हा मिञपरीवार तिर्थक्षेञ  तुळजापूरात सर्व मिञ परिवार,दाखल झाला व .मंदिर देवस्थान कार्यालयात मुख्यमंत्री साहेबांचा सुंदर फेटा , पुष्पहार ,शाल ,देवीची प्रतिमा  देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ.अभय लूनावत, माढा, डॉ. हेमंत श्रीगिरे, लोहारा , डॉ. मेहबुब मुलानी, दाळींब, डॉ.जितेंद्र पाटील, नळदुर्ग डॉ. शिवशंकर शिवगुंडे, आलुर डॉ.संजय कदम, जळकोट हे सर्व मित्र सह कुटूंब हजर होते.  या प्रसंगी श्री विशाल रोचकरी, श्री.उत्तमराव पाटील, व इतर मित्र मंडळी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ अभय लूणावत यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top