उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे असुन या स्थळांना भेटी देण्यासाठी देशी विदेशी व परजिल्ह्यातील पर्यटक येतात.आज रोजी सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापिठातील विद्यार्थी यांचा अभ्यास दौरा धाराशिव लेणी व तेर येथील ऐतिहासिक बौध्द स्तुप, हेमाडपंथी मंदिरे, पुरान वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी आले असता पर्यटन विकास समितीच्या वतीने सहलीचे स्वागत करण्यात आले.

पर्यटन जनजागृती संस्था उस्मानाबाद संचलित पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी सहलीतील पर्यटक शिक्षक, विद्यार्थी यांना धाराशिव लेणी व जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांची माहिती दिली. अभ्यासवर्गातील आलेल्या शिक्षक, विद्यार्थी पर्यटकांनी समितीचे आभार मानले. या वेळी सोबत आलेले प्रा.डॉ.सदाशिव देवकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करतांना पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे, गणेश वाघमारे,अब्दुल लतिफ,रविंद्र शिंदे, प्रा.अभिमान हंगरकर, बाबासाहेब गुळीग,विजय गायकवाड अन्य इतर उपस्थित होते.

 
Top