उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व लातूर जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देशीकेंद्र विद्यालय लातूर येथे विभागीय शालेय थ्रोबॉल या क्रीडा प्रकारच्या १४,१७,१९ वर्षे मुले व मुलीच्या विभागीय शालेय थ्रोबॉल स्पर्धा संपन्न झाल्या.

या स्पर्धेसाठी लातूर विभागातील उस्मानाबाद,लातूर,नांदेड येथील जिल्ह्यातील शाळांनी,महाविद्यालयांनी व खेळाडूनी विभागीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत आपला सह्भाग नोंदवला होता. शालेय व्यवस्थान समिती वाडीबामणी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीबामनी यांच्या संयुक्त विद्यमाने   जि प प्राथमिक शाळा वाडीबामणीच्या मैदानावर स्पर्धेतील विजयी खेळाडू,क्रीडा मार्गदर्शक बालाजी पवार सर,बळीराम कांबळे,योगेश ताटे,शंकर लोभे,ओमकार माळी,महादेव जामगांवकर,किरण जाधव,दिपाली कदम यांचा सत्कार उस्मानाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,तात्याराव माने,प्रवीण पाणथरे,तालुका क्रीडा अधिकारी कैलास लटके,वडगाव पंचायत समितीचे सदस्य गजेंद्र जाधव,सरपंच नागेंद्र पाटील,उपसरपंच अमर माने,यशश्री क्लासेसचे संचालक रवी शितोळे,बालाजी बिडवे,तात्याराव शिंदे,संजीवनी पाणथरे यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ,हार,श्रीफळ,व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक दिलीप नन्नवरे,बाळासाहेब नरवडे,विजय पारवे,बालाजी पारवे,चव्हाण राजाराम,वरुडकर उषा,दत्तात्रय भालेकर,संजय पारवे,चौधरी संजीवन,नानासाहेब चव्हाण,सुरवसे राजू,मोटे इंद्रजीत गावातील गावकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सूत्रसंचालन लगद यांनी तर आभार प्रदर्शन भालेकर दत्तात्रय यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्तंडे संतोष,तानाजी मोरे,किशोर चव्हाण,महेश शिंदे,किरण शिंदे,लहू मोटे तसेच सर्व शिक्षकवृंद,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.


 
Top