उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खरीप २०२२ मधील नुकसानीपोटी पहिल्या टप्यात पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीकडे राज्य व केंद्र सरकारच्या हप्त्याची रक्कम प्राप्त होताच या आठवड्यात रुपये २०० कोटी वितरित करण्याचे विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसंचालक श्री सिद्धेश राम सुब्रमण्यम यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील   यांना आश्वस्त केले होते, व त्या अनुषंगाने आज विमा वितरणास सुरुवात झाली आहे.

 खरीप २०२२ मधील पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने आजवर रुपये २५८ कोटी वितरित केले असून आता रुपये २०० कोटी वितरित करण्यास सुरुवात केली आहे. यातून बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मात्र तरीही ५० % भारांकण लावून वितरित केलेली नुकसान भरपाई, अत्यल्प विमा रक्कम मिळालेले शेतकरी, अधिसूचना देऊनही नुकसान भरपाई न मिळालेले शेतकरी व पंचनामा न झालेल्या शेतकऱ्यांसाठीचा लढा पुढे सुरूच राहणार आहे. यासाठी पंचनामे आवश्यक असून धाराशिव येथील कार्यालयावरील हल्ल्यामुळे मुंबई कार्यालयात पंचनामे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

 सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी प्रलंबित अनुदानासह  खरीप २०२० व खरीप २०२१ मधील उर्वरित विम्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


 
Top