तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील  ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरात तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून 362 रुग्णांच्या आरोग्याची तपासणी  करण्यात आली.

 यावेळी तेरसह परिसरातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबिरास प्रतिसाद मिळाला. शिबीराचे उद्घाटन तेरच्या सरपंच दिदी काळे , उपसरपंच श्रीमंत फंड, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुभाष कुलकर्णी , माजी सरपंच पांडुरंग बगाडे , एकात्मिक बाल विकासच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी मनिषा पाटील , वैद्यकीय अधिक्षिका  डॉ नागनंदा मगरे ,  संजय भक्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन  करण्यात आले महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री .तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात  वैद्यकीय अधिकारी डॉ.सचीन कोठावळे , डॉ.स्नेहल क्षिरसागर , डॉ.संगमेश्वर घोंगडे , डॉ.श्वेता पवार, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ.आयुब शेख यांनी रूग्णांची तपासणी केली .

यावेळी  रामा कोळी, नवनाथ पसारे , अजीत कदम , प्रवीण साळूंंखे ,संजय लोमटे , सहाय्यक अधिक्षक अमोल आग्रे, लिपिक दत्ता वाघे , अधिपरिचारिका संगिता चव्हाण  , जिल्हा परिषद पेठ शाळेचे मुख्याध्यापक गणपती यरकळ , संजय जाधव उपस्थिति होते.शिबीर यशस्वी करण्यासाठी शरद कांबळे , संतोष सरवदे , दिपक गायकवाड  , राजाभाऊ लांडगे , मिमोह अडसूळ  , सविता गुळवे , निता कांळूंखे यांनी परिश्रम घेतले.


 
Top