तुळजापुर/ प्रतिनिधी-

 येथील उस्मानाबाद रोडवर असणाऱ्या आठवडा बाजार परिसरात  लावलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली.  यामुळे दुचाकी वाहन मालकांनमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

या बाबतीत अधिक माहीती अशी की,देवळाली, (ता. तुळजापूर)  येथील सचिन घोडके यांची अंदाजे ४०,००० ₹ किंमतीची

हिरो स्प्लेंडर मोटरसायकल ( क्रं एमएच २५ ए. आर. ३२९३ ) ही  तुळजापूर आठवडी बाजार येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सचिन घोडके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम ४६१, ३८० अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top