कळंब/प्रतिनिधी

 महाराजांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करून, समाजात दुही निर्माण करण्याचे काम काही ईतिहासकारांनी केले आहे, शिवराय हे कोणत्याही जातीचे शत्रू नव्हते , त्यांच्या राज्यात सर्वच प्रमुख पदावर मुस्लिम मावळे होते,परंतु जाणून-बुजून हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली करण्याचे काम होत आहे,म्हणूनच दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान राबवणे काळाची गरज आहे, छत्रपती ही पदवी नसून ती जबाबदारी आहे. मुस्लिमांनीही हिंदूंचा द्वेष करणे टाळावे असे प्रतिपादन दंगलमुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख शिवव्याख्याते सुबानअली शेख यांनी केले.

   कळंब येथील शिवसेवा तालीम संघाच्या कै. नरसिंग जाधव विचारपीठावर वसमत येथील सुबानअली शेख यांनी  "लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज" या विषयावर चौथे पुष्प गुंफले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला छ. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.या वेळी व्यासपीठावर प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.त्यांचा शीवसेवा तालीम संघाचे मुख्य संयोजक शिवाजी आप्पा कापसे, श्याम नाना खबाले यांनी सत्कार केला.

   आई जिजाऊंची स्वराज्यांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी छ. शिवरायांनी आयुष्यभर संघर्ष केला , व या संघर्षात मुस्लिम मावळ्यांनी साथ दिली परंतु इतिहासकारांनी जाणून-बुजून मुस्लिमांना शिवरायापासून वेगळे करण्याचा घाट घातला जात आहे. शिवरायांनी मंदिरासोबतच ,मुस्लिम मावळ्यांसाठी मज्जीदि ही बांधल्या असून.परंतु आज ही दोनीही स्थळे सुरक्षित नाहीत,त्याला जबाबदार कोण,मुस्लिम एकनिष्ठ होते व आज ही आहेत, गद्दारी त्यांच्या रक्तात नाही म्हणूनच मानवतावादी शिवाजी सांगण्याची गरज आहे. महात्मा फुलेनीं पहिला पोवाडा महम्मद पैंगारावर लिहिला मग हे महापुरुष द्वेष्टे कसे, हे ही मुस्लिमांनी समजावून घेण्याची गरज आहे. अफजलखानाच्या भेटीला जाताना ,शिवरायासोबत अंगरक्षक म्हणून मुस्लीम होते,यावरुन महाराजांचा सर्वधर्मीयांवर असलेला विश्वास दिसून येतो, यासह अनके दाखले देवून  छ. शिवाजी महाराज यांचे धर्मनिरपेक्ष धोरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न व्याख्याते सुभानअली शेख यांनी केले.

   व्याख्यान मालेच्या सुरुवातीस बाल व्याख्याते  यांचा पाहूंनाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्याखायनमालेचे सूत्रसंचलन प्रा.जगदीश गवळी, महादेव गपाट, परमेश्वर पालकर  यांनी केले. जिजाऊ वंदनाने सुरुवात तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. या व्याख्यानाला शहरातील महिला ,पुरुष,व्यापारी वर्गानी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

 
Top