उस्मानाबाद/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने आपलं धाराशिव या नामफलकाच्या सोहळ्याचे अनावरण शिवसेना (बाळासाहेब) चे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांच्या हस्ते दि.१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. 

यावेळी हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी व जय भवानी, जय शिवरायच्या अशा घोषणाबाजीत हा सोहळा पार पडला. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष धर्मराज सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष मनोद्दीन पठाण,  सिध्दार्थ बनसोडे,  मिलिंद कोकाटे, शशिकांत खुणे, रवि मुंडे,  सनी पवार, गुंडोपंत जोशी , संतोष घोरपडे, व्यंकट कोळी आदींसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top