उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अँटी करप्शन कमिटी, अलिस व  भ्रष्ट्राचार निर्मुलन समितीच्या जनसंवाद यात्रेचे उस्मानाबाद येथे शनिवारी (दि.११) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष रबिंद्र द्विवेदी व मान्यवरांनी उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी मराठवाडा व उस्मानाबाद जिल्हा समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री. द्विवेदी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

  उस्मानाबाद येथील विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष रबिंद्र द्विवेदी हे संवाद साधताना म्हणाले की, अँटी करप्शन कमिटी, अलिस व  भ्रष्ट्राचार निर्मुलन समितीच्या जनसंवाद रॅलीची सुरुवात मुंबई येथून (दि.८) झाली असून ही रॅली (दि.१५) फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्हा व प्रमुख तालुक्यातून काढण्यात येणार आहे. भ्रष्ट्राचार निर्मुलन समितीच्या माध्यमातून देशभरातून भ्रष्टाचार मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. राज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारी चे प्रमाण वाढले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, येथे तुळजा भवानी मातेचे दर्शन व आशीर्वाद घेऊन भ्रष्टाचार निर्मुलन समितीची जनसंवाद रॅली उस्मानाबाद मध्ये आली आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांच्या प्राप्त झालेल्या तक्रारीचा संपूर्ण अहवाल, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, यांना दिला जाणार आहे.

 आमची संघटना राष्ट्रीय स्तरावर देशात ७१४ जिल्ह्यात काम करीत आहे. आम्ही भ्रष्टाचार बाबत जनतेपर्यंत जाऊन जनजागृती करणार आहोत, राज्य सरकारला मी विनंती करणार आहे की २०२३-२४ मध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, आमदार, खासदार, पत्रकार, जिल्हाधिकारी, न्यायाधीश यांची सक्षम कमिटी बनवून नागरिकांसाठी काम करावे, कमिटी मार्फ़त जमिनीचे वाद, कब्जा यासह आदी वाद मिटविण्यासाठी गाव स्तरावर, कार्य होणे गरजेचे आहे.

पत्रकार अहोरात्र काम करतात परंतु त्यांना शासन कसलीही मदत करत नाही, पत्रकारांनी बातमीद्वारे बाहेर काढलेला भ्रष्टाचारावर अधिकारी पांघरून घालत आहेत. कामगारामुळे आपला देश चालत आहे, कामगार विभागामार्फत झालेल्या भ्रष्टाचाराची व अन्याय अत्याचाराबाबत राज्य व केंद्र शासनाकडे आवाज उठवून कामगारांचे प्रश्न सोडवणार, तरुणांना अनेक बँका व्यवसाय करण्यासाठी सतत चकरा मारूनही बँका कर्ज नाकारत आहेत ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. देशात अदानी, निरव मोदी सारखे करोडो चे कर्ज घेऊन बँकांना बुडवत आहेत त्यांचे कर्ज माफ होत आहे परंतु सर्वसामान्यांचे कर्ज फेडण्यासाठी घरावरील पत्रे विकण्याची वेळ येत आहे तरीपण कर्ज वसुली थांबत नाही ही बाब गंभीर असून याबाबत केंद्राकडे अहवाल सादर करणार आहे.

 भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या पदाधिकारी यांना पोलीस संरक्षण देत नसल्याने आमचे पदाधिकारी भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी कसे काम करणार? याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना याप्रकरणी आम्ही तक्रार करणार असून पदाधिकाऱ्यांना संरक्षण देणे आवश्यक आहे. कोरोना काळात अनेकांनी जीव गमावला, अनेकांना पलायन करावे लागले, करोडोचा फंड येऊन नागरिकांना दिलासा नाही, गॅस, डिझेल, पेट्रोल ची महागाई खूप वाढली आहे महागाईमुळे जनता होर पळली जात आहे. महागाई कमी करुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने उपाय योजना आवश्यक आहे. आमची संस्था भ्रष्टाचार विरुद्ध लढत आहे यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. आमच्या संस्थेचा कोणत्याही राजकीय पार्टीशी संबंध नाही, आमची कमिटी अन्याया विरुद्ध आवाज उठवण्यासाठी काम करीत असल्याचे शेवटी ते म्हणाले.

  यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष पंचाक्षरी चव्हाण, कार्याध्यक्ष अलोक द्विवेदी, मुंबई अध्यक्ष दिलीप शहा, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किरण दणके, दक्षता अधिकारी मुंबई अभय झां, महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष राजश्री बाळे, महिला बालकल्याण विभाग राष्ट्रीय उपाध्यक्ष सुलेखा प्रभुघाटे, बिहार प्रदेश अध्यक्ष अनुप मंडल, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हरेश पाटडिया, जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र शंकरसिंह परमार, सदस्य रेश्मा मेहबूब शेख, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सतीश घोडेराव, सामाजिक कार्यकर्ते बंडु ताटे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 
Top