उस्मानाबाद/प्रतिनिधी

शिगोली आश्रम शाळेत संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिंदे कुमंत, प्रमुख पाहुणे पाटील रत्नाकर सर यांनी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. 

अध्यक्ष भाषणात शिंदे कुमंत यांनी महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्राची माहिती दिली. प्रमुख पाहुणे पाटील रत्नाकर यांनी विद्यार्थ्यांना महाराजांचे शिकवणूक सांगितली, झाडे लावा, गाईचे संगोपन करा, व्यसनापासून दूर राहा, चांगले कार्य करा महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी जीवन जगले पाहिजे असे मार्गदर्शन केले.  विद्यार्थ्यांनी बंजारा गीताचे गायन केले, भाषणे केले. शानिमे कैलास   यांनी विद्यार्थ्यांची नाटिका सादर केली. कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन  दीपक खबोले  यांनी केले, 

कार्यक्रमासाठी  पर्यवेक्षक शेख अब्बास अली, सूर्यकांत बर्दापुरे, जाधव चंद्रकांत, पडवळ खंडू, प्रशांत राठोड, विशाल राठोड, राठोड.एस.पी, सुधीर कांबळे, राठोड सचिन, सतीश कुंभार इत्यादी सहशिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, वसंत भिसे, बबन चव्हाण, रेवा चव्हाण, सचिन माळी, अविनाश घोडके, अमोल जगताप व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top