तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात तीन ठिकाणी  चालु असलेल्या  चक्री नावाच्या जुगारावर छापा मारला असता छाप्यात एकुण रोख रक्कम २,३७,४००/- रु. मुद्देमाल मिळुन आला व १२ आरोपीतांवर वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरील कारवाई मंगळवार,दि.७रोजी करण्यात आली. 

 पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने आणि एम. रमेश सहा.पोलीस अधीक्षक, उपविभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक हे जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांची  माहिती काढुन कार्यवाही करण्यासाठी दि.०७ फेब्रुवारी रोजी गस्तीस होते. तेव्हा पथकास खात्रीलायक माहिती मिळाली की, तुळजापुर बसस्थानक परिसरातील क्रांती चौकातील सिध्दी लॉजच्या बाजुच्या रुममध्ये काही इसम चक्री नावाचा जुगार खेळत आणि खेळवित आहेत. तेव्हा पथकाने १६:२० वा. सू अचानक छापा मारला असता तेथे  महेश नानासाहेब भोसले (वय ३० वर्षे), तुळजापूर  दिनेश नानासाहेब भोसले (वय ३३ वर्षे), रा क्रांती चौक तुळजापूर व  सुधील अर्जुनसिंग ठाकुर (वय २५ वर्षे), रा. टाकविकी ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद सुरेश कोंडीबा घाडगे (वय २५ वर्षे) वेताळ नगर, तुळजापुर ता. तुळजापुर जि.उस्मानाबाद त्यांच्याकडे रोख रक्कम ३५, ३२० / रु. व जुगाराचे साहीत्य १,०३,१००/- रु. असे मिळून आले.  तसेच दुस-या ठिकाणी जुन्या बसस्थानका समोर सागर हॉटेलच्या पाठीमागे कॉम्प्लेक्स एका रुम मध्ये १७.०५ वा. छापा मारला असता चक्री नावाचा जुगार खेळत असताना अनिल मरगु पवार (वय ३६ वर्षे) रा. वडार गल्ली घाटशिळ रोड तुळजापूर अहमद जाफर शेख (वय ४४ वर्षे) रा. शुक्रवार पेठ तुळजापुर  समाधान रमेश धुमाळ (वय २१ वर्षे) रा. खंडाळा ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद यांच्या जवळ रोख रक्कम २०४६० /- रु. व जुगाराचे साहीत्य ३८००० /- रु. मिळून आले. 

 तसेच तिस-या ठिकाणी जुन्या बसस्थानक समोर जगदंबा टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील रुममध्ये  छापा मारला असता चक्री नावाचे जुगार खेळत असताना  मयुर मधुकर काळे (वय २१ वर्षे) रा. राम मंदीर परिसर जिंतुर ता. जिंतुर जि. परभणी हा. मु. नवीन बसस्टँड समोर लातुर रोड तुळजापुर  लक्ष्मण ज्ञानदेव माळी (वय ३२ वर्षे) रा. अपसिंगा ता. तुळजापुर 

 आकाश प्रकाश पवार (वय २७ वर्षे) रा. सारोळा ता. तुळजापुर   अजित अशोक कांबळे (वय २६ वर्षे) रा. मातंग नगर शुक्रवार पेठ तुळजापुर  विश्वजीत पोपट कांबळे (वय २५ वर्षे) रा. ढेकर ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद त्यांच्याकडे रोख रक्कम १८,८२० / रु. व जुगाराचे साहीत्य २९७००/- रु. असे साहित्य मिळून आले

 अशा प्रकारे एकुण तीन ठिकाणी तुळजापुर शहरात चक्री नावाच्या जुगारावर छापा मारला असता छाप्यात एकुण रोख रक्कम २,३७,४००/- रु. मुद्देमाल मिळुन आला व १२ आरोपीतांवर वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी सहा. पोलीस अधीक्षक एम. रमेश उपविभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पुजरवाड, पोलीस अंमलदार सादीक शेख, नवनाथ खांडेकर, श्रीकांत भांगे, विठ्ठल गरड, किरण अंभोरे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top