तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील शिवभोजन केंद्र फलक गायब चे वृत्त दै.  भास्कर  व पुराेगामी विचाराचे लोकराज्य या पोर्टमध्ये मध्ये  प्रसिध्द होताच याची प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याने संबधित शिवभोजन चालकाने दर्शनी भागावर शिवभोजन केंद्र असे फलक लावल्याने गायब झालेले शिवभोजन केंद्र आता दृष्टीस पडू लागले आहे. 

तिर्थक्षेञी दोन शिवभोजन केंद्र असुन एक मंदीर परिसरातील  व दुसरे जुने बसस्थानक समोर असणाऱ्या हाँटेल येथे आहेत.येथे शिवभोजनची थाळी गोरगरीबांना दहा रुपयाच्या थाळी वितरीत होत होत्या माञ अचानक गेली अनेक महिन्या पासुन शिवभोजन याळी केंद्रावर असणारे फलक गायब झाल्याने गोरगरीब लोकांना शिवभोजन थाळीपासुन वंचित राहावे लागत होते या संबंधी वृत्त प्रसिध्द होताच शिवभोजन थाळी चे फलक दरासह लागल्यामुळे गोरगरीबांना दिलासा मिळाला आहे.


 
Top