उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलचा मुलींचा खो-खो संघ प्रतिस्पर्धी नाशिकच्या संघास हरवून अंतिम विजेता ठरला.    सांगली येथील विटा येथे झालेल्या १९ वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या मुलींच्या  संघाने लातूर विभागाचे प्रतिनिधीत्व करत अंतिम सामन्यात नाशिक संघाचा दणदणीत पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले .

 या संघाला मार्गदर्शक म्हणून  प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रवीण बागल व प्रा .विवेक कापसे यांनी मार्गदर्शन केले .   त्याचबरोबर क्रीडा शिक्षक अभिजीत पाटील व सर्व क्रीडा अध्यापकांचे संस्थेच्यावतीने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील , प्रशासकीय अधिकारी  आदित्य पाटील तसेच प्रशालेचे प्राचार्य एस.एस देशमुख , उपप्राचार्य एस . के . घार्गे , उपमुख्याध्यापक एस.बी. कोळी , पर्यवेक्षक वाय. के . इंगळे , श्रीमती बी. बी .गुंड , टी.पी . शेटे , आर .बी . जाधव , के. वाय. गायकवाड , डी . ए . देशमुख यांनी खेळाडू  आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले .

 
Top