उमरगा / प्रतिनिधी-

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि.९) महाआरोग्य शिबीर व महारक्तदान शिबीराचे आयोजन, जागरूक पालक, सुदॄढ बालक अभियानाचे उद्घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी २७ लोकांनी  रक्तदान केले. तर ६१४ रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांमार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उमरगा उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि.९) महाआरोग्य शिबीर व महारक्तदान शिबीर तसेच जागरूक पालक, सुदॄढ बालक अभियानाचे उद्घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी युवानेते किरण गायकवाड, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनोद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास साळुंखे, डॉ.उदय मोरे, डॉ.विक्रम आळंगेकर, डॉ.प्रवीण जगताप, रुग्णालयातील कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात २५ पुरुषांनी व २ महिलांनी रक्तदान केले. तर ६१४ रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.

 
Top