उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी मिलेट दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अभिमन्यू काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा  दाखवुन सुरुवात करण्यात आली.

  संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिकतृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे जागतिक स्तरावर “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून साजरे केले जात असून आहारातील तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी हा याचा प्रमुख हेतू आहे पौष्टीक तृणधान्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी बाजार मार्फत या जनजागृती मिलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पासून सुरू होऊन बार्शी नाका, जिजाऊ चौक, काळा मारुती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हाधिकारी कार्यालय  व शेवट मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे समारोप करण्यात आला.

 रॅलीच्या समारोपानंतर उपस्थित सर्व नागरिक, शालेय विद्यार्थी,अधिकारी व कर्मचारी यांना ज्वारीचा हुर्डा व चटणी अलपोहार म्हणून देण्यात आली.या रॅलीच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य जसे, ज्वारी, बाजरी, नाचणी राळा,भगर इत्यादी धान्यांचा आहारात दैनंदिन वापर करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.


 
Top