तब्बल 8 दिवसा नंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार    

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नगर परिषदेमार्फत उजनी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहराला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. गेल्या दहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याची बाब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर नगर परिषद प्रशासनाला तत्काळ थकबाकी रक्कम भरण्याबाबत सूचना दिल्या. नगर परिषद प्रशासनाने उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीअंतर्गत वीज पुरवठ्याच्या थकबाकीतील 20 लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर सोलापूर जिल्हा हद्दीतील पंपहाऊसच्या थकबाकीची रक्कमही भरण्यात आली असल्याने शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली होणार आहे. 

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या प्रयत्नामुळे शहरवासीयांची पाण्याअभावी निर्माण झालेली गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 
Top