उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या आदेशान्वये उस्मानाबाद अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष अॅड.सुभाष राऊत व विभागीय अध्यक्ष मकरंद सावे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये संघटन वाढीसाठी व नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून जिल्हा अध्यक्षांसह जिल्हा कार्यकारिणीची नव्याने निवड होणार असून याबाबत संघटनेचे निरीक्षक लवकरच उस्मानाबाद जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा करणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड.सुभाष राऊत व विभागीय अध्यक्ष मकरंद सावे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 
Top