उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा करणार्‍या उजनी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या दहा दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागरमोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद नगर परिषदेअंतर्गत शहर पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेली आहे. केवळ नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे  दर महिन्यातून दहा ते पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद राहतो. सध्या शहरात गेल्या दहा दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागरमोर्चा काढून उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्यासह पदाधिकारी कादरभाई खान, वाजीद पठाण, महादेव माळी, कुणाल निंबाळकर, पलय काकडे, नंदकुमार गवारे, संगीताताई काळे, ज्योतीताई माळाळे, आयाज शेख, बाबा मुजावर, इस्माईलबाबा शेख, पृथ्वीराज चिलवंत, मृत्युंजय बनसोडे, सतीश घोडेराव, नारायण तुरुप, विवेक घोगरे, राजकुमार पवार, विशाल शिंगाडे, मनोज मुदगल, सरफराज कुरेशी, अनिकेत पाटील, सौरभ देशमुख, वैभव मोरे, राजपाल दुधभाते, शेखर घोडके, रणवीर इंगळे, अ‍ॅड.योगेश सोने पाटील, अ‍ॅड.अविनाश जाधव, बिलाल तांबोळी, अजय कोळी, मेहमूद मुजावर, असलम शेख, सचिन शिंदे, पृथ्वीराज मुळे, कुणाल कर्णवर,  सूरज वडवले व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top