तुळजापूर / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवार दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, तुळजापूर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात तुळजापूर व परिसरातील सर्व वयोगटातील ४५५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन  किशोर साठे, रत्नदिप भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे, दत्ता भोसले, कृष्णा गायकवाड, मुख्याध्यापक सुधिर सरकाळे, सुनिल शिंदे, अमर बनसोडे, चंद्रकांत भोसले, सागर बनसोडे, सरस्वती भोसले, धोंडाबाई खंदारे, सुलोचना शिंदे, सविता क्षीरसागर, खंडागळे कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.बन्सरी पटेल, डॉ.म्रुदूल व्यास, डॉ. विजयसिंह राऊत, डॉ.नागार्जुन सोनकांबळे, डॉ.तेजस राणे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे निशिकांत लोकरे, अमीन सय्यद, विनोद ओहळ, मुकुंद खरे, आकाश पवार, संदिप खाचरे, सचिन व्हटकर यांनी परीश्रम घेतले.


 
Top