कळंब/ प्रतिनिधी-

प्रत्येक गावातील निराधार, वयोवृद्ध, अपंग व्यक्तींसाठी श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून " शिवभोग सामुदायिक स्वयंपाकघर " सुरू करण्यात येणार आहे . याची सुरुवात लोहटा पूर्व या गावात पाहिले स्वयंपाक घर चालू करण्यात आले आहे. हे कायम स्वरुपी असणार आहे.या मुळे भुकेलेल्याना पोटभर अन्न मिळणार आहे.   या उपक्रमाचे उद्घाटन प्रियदर्शनी बँकेचे चेअरमन श्रीधर   भवर   यांच्या हस्ते करण्यात आले,

यावेळी  प्रमुख उपस्थिती श्रीमती.सरिकाताई नरसिंग जाधव, सौ.स्वप्नाली रमेश भोसले,  विश्वजीत  जाधव  ,   पुरुषोत्तम   चाळक ,   ज्ञानेश्वर   भोसले  , महेश खोसे  , विजय थोरात  , तानाजी आडसुळ    तसेच सर्व पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

       दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील समस्या खूप मोठी आहे आणि श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशनने आपल्या स्वयंपाकघर सुविधांचा विस्तार आणखी अनेक गावांमध्ये करू इच्छित आहे. पण आपल्या मदतीशिवाय श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन हे करू शकत नाही.त्यासाठी मदतीची गरज असून, सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष विश्वजीत जाधव यांनी सांगितले.


 
Top