तुळजापुर/ प्रतिनिधी-

  तुळजापुर तालुक्यातील  काक्रंबा  येथील सध्याच्या ग्रामसेवकाचे वर्तन ग्रामसेवक पदाला शोभणारे नसल्याने  ग्रामसेवक अदिनाथ केवलराम यांची तात्काळ बदली करण्याची मागणी  ग्रामस्थांनी  प्रशांतसिंह मरोड  गटविकास अधिकारी, पं.स यांना निवेदन देवुन केली आहे.

 निवेदनात म्हटलं आहे की, मौजे काक्रंबा  येथील ग्रामसेवक अदिनाथ केवळराम हे वेळेवर उपस्थीत नसने, ग्रामस्थांना वेळेवर कागदपत्र न देणे, ग्रा. प. सदस्यांना न सांगता कारभार करणे, ग्रा. प. सदस्यांनी माहीती विचारल्यास न सांगणे विशीष्ट सदस्यांनाच माहीती देणे व योजना सांगणे भेदभाव करणे, राजकीय हस्तक्षेप करणे, राजकारण करणे हे  गंभीर असून ग्रामसेवकांच्या वर्तनास  शोभनारे वर्तन  नाही यामुळे गावच्या प्रगतीस व विकासास खिळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे  ग्रामसेवकास  बदलुन देण्याची मागणी  ग्रामपंचायत सदस्य  "अनिता  मस्क,   सविता  बंडगर, शितल  चंदनाशिवे, विशाल   खताळ, सद्दाम मुलानी , वर्षा  बंडगर, चेतन बंडगर यांनी    राहुल गुप्ता स मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे. 


 
Top