कळंब / प्रतिनिधी-

 तालुक्यातील शेतकरऱ्यांच्या  विविध अडचनी समोर असतांना प्रशासन मुग गिळून गप्प आहे म्हणुन   स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक 22 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून , त्याचे कळंब तहसीलदार  यांना निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात पिक विमा / लाईट / सोयाबीन चे पडलेले दर / उस उत्पादक शेतकऱ्यांची  उसतोड मुकदमाकडून होणारी लुट / थकीत fr.P / नादुरुस्त DP . स्वामीनाथन आयोग लागु करण्यास होणारी सरकार कडून टाळाटाळ ' संभाव्य विजदर वाढ , बुलढाणा येथे शेतकऱ्यांवर झालेला लाटीचार्ज ' शेतकऱ्यांचे जळालेले डी पी दुरुस्त करण्यास होणार विलंब ' कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ दयावी ' रासायनिक खतांचे वाढलेले दर या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मा खा . राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण राज्यभर रस्ता रोको आंदोलन होणार आहेत.  कळंब तालुक्यातील शिराढोण येथे दि . 22/2 /23  बुधवार रोजी शिराढोण कळंब लातुर रोड चौक पेट्रोलपंप शिराढोण येथे रस्ता रोको होणार असल्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे . यावेळी  देतांना विष्णु दास काळे ( स्वाभीमानी शेतकरी संघटना युवा जिल्हा अध्यक्ष ) सचिन टेळे ( युवा स्वा. पक्ष जि अध्यक्ष ) कमलाकर पवार (कळंब ता अध्यक्ष ) शशि चव्हान ( युवा ता अध्यक्ष ) पंकेश पाटील अजय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .


 
Top