उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अशोक लिलॅड पिकअप या वाहनाची किल्ली हरवल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला लावून झोपलेल्या चालक व अन्य एकाला पिकअपचा दरवाजा उघडून जबर मारहाण केल्याने  तुळजापूर येथील पाच जणांना  दरोडा व खून प्रकरणामध्ये   १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा  दि. १३ फेब्रुवारी रोजी सुनावण्यात आली. सदर प्रकरण आर. एस. गुप्ता ,  अतिरिक्त सत्र न्यायाधिश - १, उस्मानाबाद यांच्या न्यायालयात  चालले. 

 या प्रकरणाची थोडक्यात माहिती सरकारी वकील महेंद्र देशमुख   यांनी सांगितले की, पुणे येथील इंड्स स्टॉवर कंपनीचा माल मराठवाड्यात वितरीत करून दि.१५ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या गावी थांबले.   फिर्यादी चालक विजय कळबंडे व सोमनाथ कांबळे यांचे गाव उजनी व औसा असल्यामुळे ते   थांबून रात्री ९ च्या दरम्यान तुळजापूर मार्गे पुण्याकडे निघाले. तुळजापूर येथे आले असता. सुपारी व लघुशंकेसाठी गाडी थांबवली. यादरम्यान त्यांच्याकडून पिकअपची चावी हरवली.त्यामुळे रात्री बसस्थानकासमोरील चौकात गाडी लावून तेथेच थांबले. मध्यरात्री पाच जणांनी येऊन पिकअपच्या दारावर लाथा घातल्या. त्यामुळे चालकाने दार उघडले असता.समोरील पाच जणांनी मारहाण करून त्याच्या खिशातील पैसे व इतर साहित्या हिसकावून घेतले. तर चालकासोबत असलेल्या सोमनाथला पिकअपच्या पाठीमागे बसवून दोघांनी मारहाण केली तर अन्य तीघांनी चालकाला मारहाण करत पिकअप चालू करून तुळजापूरच्या बाहेर घेऊन गेले. त्यानंतर चालकाला खाली उतरवरून व सोमनाथला रस्त्यावर फेकले ते पाहताच चालक अंधारात घाबरून पळत सुटला होता. त्याने पोलिस गाडी दिसताच सदर प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सोमनाथला त्वरीत हॉस्पीटलमध्ये नेहले असता तो मयत झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून पाच आरोपी विरूध्द   पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुन्हा रजि. क्र. २९०/२०१८, कलम ३६३, ३९६ भा. दं. वि. अन्वये दाखल होवुन पोलीस निरीक्षक आर.एस. बोकडे, पोलीस ठाणे तुळजापूर यांनी करुन तपासाअंती दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात आले. 

सदर प्रकरणामध्ये  महेंद्र बी. देशमुख, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता, उस्मानाबाद यांनी काम पाहिले. सदर प्रकरणामध्ये एकुण ०७ साक्षीदारांचा पुरावा  न्यायालयामध्ये नोंदविण्यात आला. सदर प्रकरणामध्ये आरोपींची ओळख पटविण्याच्या दृष्टीने आरोपींची ओळखपरेड घेण्यात आलेली होती व त्या अनुषंगाने   न्यायालयामध्ये पुरावा देण्यात आला. सदर प्रकरणामधील आरोपींना फिर्यादीने ओळखले व प्रकरणामध्ये आलेला एकुण पुरावा व आरोपीकडुन जप्त केलेला मुद्देमाल याबाबी मा. न्यायालयामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने सिध्द झाल्यामुळे  आर. एस. गुप्ता  , अतिरिक्त सत्र न्यायाधिश - १, उस्मानाबाद यांनी आरोपी  लक्ष्मण बळीराम ढवळे (वय २५ वर्षे रा. हडको तुळजापूर),  अजय बंडु क्षिरसागर (वय २१ वर्षे रा. मातंगनगर तुळजापूर),  विकी रविंद्र कोरडे (वय २५ वर्षे, रा. आनंदनगर हडको तुळजापूर),   नितीन वसंतराव हेडे (वय २५ वर्षे रा. विश्वासनगर हडको तुळजापूर )  खंडु विश्वनाथ कांबळे (वय १९ वर्षे रा. वेताळनगर तुळजापूर) या पाचही आरोपींना भा. दं. वि. चे कलम ३९६ अन्वये दोषी ग्राहय धरुन १० वर्षे सक्तमजुरी व दंड रुपये ५००० /. व दंड न भरल्यास ०६ महिने साधीकैद अशी शिक्षा आज दिनांक १३.०२.२०२३ रोजी सुनावली व दंडाच्या रक्कमैकी ८० टक्के रक्कम मयताचे वडील यांना नुकसान भरपाई म्हणुन देण्यास आदेशित केले.  सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने   महेंद्र बी. देशमुख, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता, उस्मानाबाद उस्मानाबाद यांनी कामकाज पाहिले. 

 
Top