उस्मानाबाद/  प्रतिनिधी-

महापुरुषांविषयी खालच्या पातळीवरील विधाने करत सतत अकलेचे तारे तोडून पदाचीही लाज न बाळगणारे भगत सिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरुन हकालपट्टी झाल्याचा उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले. महापुरुषांचा अवमान करणार्‍या महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना हटविण्यासाठी वारंवार आंदोलन करुनही केंद्र व राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर राष्ट्रपतींनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर पुरोगामी महाराष्ट्रात यापुढे महापुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.  

  उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी सोमवार, दि. 13 रोजी दुपारी कोश्यारी यांच्या हकालपट्टीचा पेढेे वाटून आनंदोत्सव साजरा करत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. महाराष्ट्राचे राज्याचे प्रमुख पद म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज्यपाल पदावर असताना हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणार्‍या कोश्यारी यांच्याबरोबर महापुरुषांचा अनादर करणार्‍या भाजपाच्या मंत्र्यांचादेखील यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

 या आनंदोत्सवात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष असदभाई पठाण, सामाजिक न्याय विभाग विभागीय सरचिटणीस अ‍ॅड.इंद्रजीत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कादरभाई खान, युवक राष्ट्रवादीचे शेरख घोडके, कुणाल निंबाळकर, वाजीद पठाण, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, राष्ट्रवादीचे सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, मा.नगरसेवक बाबा मुजावर, मृत्युंजय बनसोडे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष राजकुमार पवार, अनिकेत पाटील, लीगल सेल चे शहर अध्यक्ष योगेश सो पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सौरभ देशमुख, उपाध्यक्ष वैभव मोरे, व्यापार सेलचे शहर अध्यक्ष राजपाल दुधभाते, शेखर घोडके, रणवीर इंगळे, तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top