उस्मानाबाद,/ प्रतिनिधी-

 शिर्डी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात सफल रवींद्र केसकर हिने लक्षवेधी खेळी करत सुवर्णपदक पटकावले आहे. 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा शिर्डी येथे आयेाजित करण्यात आली होती.

किक बॉक्सिंग फेडरेशनच्यावतीने ऑल महाराष्ट्र स्टेट कॅडेट ज्युनिअर आणि सिनिअर चॅम्पियनशीप स्पर्धा शिर्डी येथे आयोजित करण्यात आली होती. यात राज्यभरातील शेकडो खेळाडूंनी त्यांच्या प्रशिक्षकांसह सहभाग घेतला होता. उस्मानाबाद येथील किक बॉक्सिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा प्रशिक्षक शरीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तीन खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. यात सफल रवींद्र केसकरने 14 वर्षे वयोगटात सुवर्णपदक,  यशराज जाधव याने 17 वर्षे वयोगटात सुवर्णपदक तर ओंकार झाल्टे याने खुल्या गटात कांस्य पदक पटकावत यश मिळविले.

सफल केसकर हिने आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा आणि विभाग स्तरावरही किक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.


 
Top