उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंह  पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन सोमवार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी, प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ ता.कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात मंगरुळ व परिसरातील सर्व वयोगटातील १४३० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ विश्वस्त विजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे मंगरुळ वि.का.सो.चे चेअरमन भागचंद बागरेचा, भाजपा युवा नेते संजय बोंदर, सरपंच सौ.केवळबाई शिंदे, उप सरपंच समाधान कानाडे, ग्रा.प.सदस्य हनुमंत रितापुरे, सौ.सिताबाई बनसोडे, श्रीमती जयश्री गायकवाड, ग्राम विकास अधिकारी भारत सोनवणे, पुरुषोत्तम रितापुरे, अतुल रितापुरे, दत्ता कोल्हे, कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. दिपक बाराते, डॉ.बन्सरी पटेल, डॉ.म्रुदूल व्यास, डॉ. विजयसिंह राऊत, डॉ.नागार्जुन सोनकांबळे, डॉ.तेजस राणे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे निशिकांत लोकरे, नामदेव शेळके, अमीन सय्यद, विनोद ओहळ, मुकुंद खरे, संदिप खोचरे, सचिन व्हटकर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आशा कार्यकर्त्या व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

 
Top