उस्मानाबाद / प्रतिनिधी-
प्रतिष्ठान भवन (भाजपा भवन) धाराशिव येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. दमयंती वाकुरे यांची धाराशिव भाजपा महिला मोर्चा शहर उपाध्यक्षपदी तर उषाताई येरकळ यांची धाराशिव महिला मोर्चा तालुका अध्यक्ष व अस्मीता ताई कांबळे माजी जि. प. अध्यक्ष यांची भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष तुळजापुर पदी निवड करण्यात आली.
यावेळी मनिषा केंद्रे, सर्जे मॅडम व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.