तेर //प्रतिनिधी 

अॅट्रासिटी कायद्याचा दुरुपयोगाच्या निषेधार्थ उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे दि.17 फेब्रुवारीला नागरीकानी कडकडीत बंद पाळला.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील कांहीं लोक वारंवार आपल्या जातीचा उपयोग करून खोट्या अॅट्रासिटी गुन्हे दाखल करत आहेत .या माध्यमातून संबंधित लोक समाजात तेढ निर्माण करत ग्रामस्थांना वेठीस धरत आहेत .त्यामुळे गावची शांतता भंग होऊन समाजातील तेढ निर्माण होत आहे. अॅट्रासिटी  कायद्याचा दुरुपयोग व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित लोकांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे नागरीकानी तेर दुरक्षेत्रचे बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर यांच्याकडे  केली आहे.


 
Top