उमरगा/ प्रतिनिधी-

 उमरगा येथील न्यायालयात दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन करण्यात आले होते.  सदरील लोकअदालतीमध्ये एकूण पाच पॅनेल करण्यांत आले होते. सदर पॅनेलवर भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे वाद असे विविध प्रकारचे मिळून (पाच न्यायालयातील नोंदणी झालेले प्रलंबित) एकूण ११८० प्रकरणे ठेवण्यांत आली होती. तसेच दावापुर्व (नोंदणी न झालेले प्रकरणे) एकूण २०७२ प्रकरणे ठेवण्यांत आली होती. प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांची उपस्थिती होती. 

एकूण ११८० प्रलंबित प्रकरणांपैकी 230 प्रकरणे निकाली निघालेली असुन यामध्ये राष्ट्रीय महामार्गक्र.९ सोलापूर ते संगारेड्डी भुसंपादन प्रकरणे-78 रक्कम-१०,०३,२९,७१६, मोटर अपघात प्रकरणे-1० रक्कम रूपये-५९,२०,०००, एन.आय अॅंक्ट 138 ची प्रकरणे-0५ रक्कम रू. ७१९५४५, दिवाणी दावे व दरखास्त ची प्रकरणे-६३ प्रकरणामध्ये रक्कम रूपये-६१९२९७४ व गुन्हा कबुल प्रकरणे - ७२ मध्ये रक्कम रूपये-१८४००/- अशी एकुण रक्कम रूपये ११३१८०६३५/- (अक्षरी-रूपये अकरा कोटी एकतीस लाख एेंशी हजार सहाशे पस्तीस रूपये फक्त) इतक्या रक्कमेत तडजोड करण्यांत आली. तसेच दिवाणी दावा पुर्व प्रकरणांमध्ये  नगर परिषद उमरगा ६८ प्रकरणे रक्कम रू. २,२२,१६१, नगर परिषद मुरूम- १६ प्रकरणे रक्कम रू. १७५५७९, पंचायत समिती उमरगा अंतर्गत ग्रामपंचायतीधील एकूण ११९ प्रकरणांमध्ये रक्कम रू. ४८२५१२  असे एकूण दावापूर्ण २०४ प्रकरणांमध्ये रक्कम रू. ९३०२५२ तडजोड करण्यात आली आहे. 

सदर लोकअदालतमध्ये एकूण ५ पॅनेलमध्ये 1) मा.श्री.डी. के. अनभुलेे साहेब, जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश-1, उमरगा 2) मा.श्री.श्रीमती. मनिषा द. चराटे साहेब, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, उमरगा 3) मा.सौ.एस.ए.कानशिडे मॅडम, सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, उमरगा 4) मा.सौ. एस. एच राठी, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, उमरगा 5) मा.श्रीमती एम. पी. मथुरे मॅडम, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, उमरगा  या न्यायीक अधिकारी आणि विधीज्ञ मंडळाचे पदाधिकारी पंच सदस्य, कर्मचारी नियुक्त करण्यांत आले होते. 

तसेच तालुका विधी सेवा समिती वरिल श्री. पी. व्ही. शेटेे, वरिष्ठ लिपीक, श्री. व्ही. एस. पाटील, कनिष्ठ लिपीक व श्री. एस. के. मुळे, शिपाई यांनी सर्व काम पाहीले


 
Top