उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आंतरजिल्हा सिनियर क्रिकेट राज्य स्पर्धेकरिता उस्मानाबाद जिल्हा संघाची निवड चाचणी सामने दि 27,28,29, जानेवारी 2023 या दरम्यान शिराळा येरमाळा जवळील ता.बार्शी येथिल क्रिडांगनावर घेण्यात आले.पुर्व अनुभव युवा खेळाडू व सिनियर अशा मिश्र खेळाडूंची जिल्हा संघाची घोषणा करण्यात आली.

कर्णधार चैतन्य पाटिल, प्रथमेश पाटील (डोण्जा) युवराज शेख, प्रसाद बहिरे, प्रसाद देशमुख, विवेकानंद गाडेकर, प्रविण कराळे,सज्जू शेख, अविनाश प्रभळकर, सिध्दनाथ जाधव, मयुरेश बिराजदार, गिरीश बोचरे,अक्षय बावस्कर,सिध्दांत गिरी, प्रथमेश पाटील (विकेट किपर)अनुराग कवडे(विकेट किपर)आकाश पवार यांची निवड झाली आहे.निवड समितीचे चेअरमन विल्सन दलभंजन,सदस्य प्रकाश ढोणे, सचिव दत्ता बंडगर,यांनी तीन दिवस मैदानावर हजर राहून बारकाईने खेळाडूंचे निरिक्षण केले.या सराव दरम्यान संघटनेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांनी 18 व 29 जानेवारी रोजी हजर राहून सर्व खेळाडू सोबत चर्चा करून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.जिल्हा संघाला प्रशिक्षक देण्याकरिता महाराष्ट्र स्टेट खेळाडू युवराज पवार यांची निवड विजय दंडनाईक यांनी केली.


 
Top