उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात वृक्षसंवर्धन चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत  वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. तसेच पोलीस मुख्यालय परिसरात उपलब्ध असलेल्या जागेत मियावाकी गार्डनची निर्मीती करण्यात येत  असून येथे कडूनिंब, पिंपळ, वड अशी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन देणारे वृक्ष तसेच जांभूळ, आंबा, पेरु, चिकू या फळझाडांसह शोभेच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद आवारात विविध 25 प्रकारच्या वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड मियावाकी म्हणजेच घनदाट वृक्ष या पध्दतीने संपूर्ण परिसर प्रदुषणमुक्त व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पोलीस दलातील अंमलदार परिश्रम घेत आहेत. येथील मैदानावर परेड मैदान, क्रिकेट मैदान, इनडोर फायरिंग रेंज उभारण्यात आले आहे.

   तसेच शहरातील नागरिकांना मॉर्निग वॉकसाठी हे गार्डन खुले करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभा घ्यावा त्याच बरोबर योगा करण्यासाठी पोलीस दला मार्फत खासव्यावस्था करण्यात येत आहे याचा ही लाभ घ्यावा असे अहवान मा.पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी  उस्मानाबाद यांनी केले आहे.तसेच यावेळी दैनिकांचे प्रतिनिधी हजर होते.


 
Top