धाराशिव / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी, धाराशिवच्या वतीने भाजपा कार्यालय प्रतिष्ठाण भवन, येथे बुथ सशक्तिकरण अभियानांतर्गत धाराशिव लोकसभा जिल्हा प्रभारी गुरुनाथ मगे व लोकसभा विस्तारक तुकाराम गोरे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हा टीम स्थापन करण्यासाठी सोशल मिडीया, डाटा इंट्री तसेच मंडळ, मोर्चाचे पदाधिकारी यांची कमकुवत बुथवर नियुक्ती करुन बुथ सशक्तिकरण अभियान चांगल्या प्रकारे राबवावे असे मत लोकसभा विस्तारक तुकाराम गोरे यांनी मांडले. कार्यशाळा मध्ये सरल ॲप अंतर्गत सर्वांना ॲप ची माहिती देऊन सदर ॲप डाऊनलोड करुन आगामी काळात भाजपा तर्फे होणाऱ्या कामाचा आढावा ॲप द्वारे घेतली जानार असल्याची माहिती देण्यात आली.

 पुढे बोलताना दि.१५ मार्च ते २५ मार्च २०२३ या काळात प्रत्येक बुथवर अल्पकालीन विस्तारक म्हणुन निवड करुन बुथ मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती गोरे यांनी दिली. एप्रील महिन्यात मोदीजींच्या मन की बात १०० वा भाग प्रत्येक बुथवर करावा असेही आवाहन करण्यात आले.

 यावेळी जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, ॲड.खंडेराव चौरे, रामदास कोळगे, ॲड. नितीन भोसले, प्रदिप शिंदे, सुधाकर गुंड, सुनिल तात्या काकडे, पांडूरंग लाटे सर, नारायण नन्नवरे, भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, राजेंद्र पाटील, राजकुमार पाटील, राजाभाऊ पाटील, महादेव वडेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अल्प संख्यांक जिल्हाध्यक्ष निहाल काझी, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top