उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कळंब पोलीस ठाण्याचे पथक दि. 19 .02.2023 रोजी पोलीस ठाणे हद्दीत   जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे आदेशा प्रमाणे संपुर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विक्री करणारे परवाना धारक अस्थापना बंद करणे बाबत आदेश झाले होते. तरी देखील कळंब शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करता बियरबार चालक हे दुकानाच्या पाठीमागील दारातून दारुविक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती पथकास मिळाली. यावर पथकाने नमूद ठिकाणी जावून पहाणी करता कळंब येथील येरमाळा रोडवरील सनराईज बिअरबार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेले हिमालया बियरबार चालक हे दोघे  दुकानाचे पाठीमागील दारातून दुकाने चालु ठेवून दारुविक्री करत असल्याचे निष्पण्‌ण्‍ झाल्याने तात्काळ उस्मानाबाद येथील दारुबंदी विभागातील अधिकारी यांना बोलावून घेउन पुढील कारवाई करीत त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

   सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने व  सहा. पोलीस अधीक्षक   एम रमेश  उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग कळंब यांचे मार्गदर्शनाखाली कळंब पो.ठा. चे पोनि  रविंद्र गायकवाड, पोउपनि श्री. रामहारी चाटे, मपोउपनि वर्षा साबळे,  पोलीस अंमलदार-  शिवाजी राऊत, बबन गलांडे, अभिजीत देशमुख, अमोल जाधव, मपोकॉ रंजना वाडकर यांच्या पथकाने केली आहे.


 
Top