उस्मानाबाद/ प्रतिनिधी 

चोरी गेलेले दागिने, मोबाईल, दुचाकी परत मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यांवर  हास्य फुलले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला.  

घरात किंवा बाहेर कोठेही चोरी झाली तर गेलेला माल परत मिळण्याची सध्या शाश्वती राहिलेली नाही. मात्र, एसपी अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात अनेक चोऱ्यांचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यातील चोरीला गेलेला संबंधितला मुद्देमाल देण्यासाठी विशेष माेहीम राबवण्यात आली. यामध्ये  पोलिस अधिक्षक कार्यालयात एका कार्यक्रमात मुद्देमाल परत करण्यात आला. यासाठी अगोदरच न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यात आली. गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी वाशी ठाण्याच्या ३, उस्मानाबाद ग्रामीण ५, येरमाळा १, तुळजापूर ५, ढोकी १, तामलवाडी २, बेंबळी १,आनंदनगर ६ अशा चोरीच्या २४ गुन्ह्यातील जप्त केलेल्या ५ दुचाकी, ४ मोबाईल, ३५ तोळे सोने  पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आला.  


 
Top